Text copied!
Bibles in Marathi

गण. 26:13-37 in Marathi

Help us?

गण. 26:13-37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.
14 ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
15 गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
16 आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,
17 अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
18 गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
19 जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
20 यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ
21 पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.
22 ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
23 इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
24 याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
25 इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
26 जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
27 जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
28 योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
29 मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.
30 गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.
31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ.
32 शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.
33 हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
35 एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
37 ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
गण. 26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी