Text copied!
Bibles in Marathi

गण. 24:10-14 in Marathi

Help us?

गण. 24:10-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामास म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
11 तर आता मला सोडून घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”
12 बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या मनुष्यांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
13 बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते.
14 तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
गण. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी