Text copied!
Bibles in Marathi

गण. 23:22-30 in Marathi

Help us?

गण. 23:22-30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तीमान आहेत.
23 याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले!
24 पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो. तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही.
25 नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको.
26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल.
27 नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल.
28 म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.
29 बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.”
30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले.
गण. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी