Text copied!
Bibles in Marathi

गण. 18:11-26 in Marathi

Help us?

गण. 18:11-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. तुझ्या घरातल्या शुद्ध असलेल्या सर्व मनुष्यांनी ती खावी.
12 आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.
14 इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल.
15 स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
16 ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे.
17 परंतु तू गाईचे प्रथम जन्मलेले, मेंढीचे प्रथम जन्मलेले आणि बकरीचे प्रथम जन्मलेले यांची खंडणी भरून सोडू नकोस. ते प्राणी पवित्र आहेत, ते माझ्यासाठी राखीव आहेत. त्यांचे रक्त वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास संतोष देतो.
18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल.
19 “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
20 परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, तुला जमीनीपैकी काहीही वतन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.
21 लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.
22 यापुढे इस्राएल लोकांनी कधीही दर्शनमंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले त्यांना पाप लागेल व ते मरतील.
23 लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.
24 परंतु इस्राएल लोक जे समर्पित अंश म्हणून परमेश्वरास अर्पण करतात ते लेव्याची वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी लेवी लोकांबद्दल असे बोललो, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही.
25 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
26 तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हास नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.
गण. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी