Text copied!
Bibles in Marathi

उप. 7:12-20 in Marathi

Help us?

उप. 7:12-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते.
13 देवाच्या कृत्यांचा विचार कराः जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?
14 जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये.
15 मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.
16 स्वनीतिमान होऊ नका, स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो?
17 दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?
18 तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.
19 एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते,
20 जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही.
उप. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी