16परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
17दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
18कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
19हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.