Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 89

स्तोत्र. 89:38-47

Help us?
Click on verse(s) to share them!
38पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
39तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
40तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
42तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
43तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
44तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
45तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
46हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
47माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?

Read स्तोत्र. 89स्तोत्र. 89
Compare स्तोत्र. 89:38-47स्तोत्र. 89:38-47