Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 84

स्तोत्र. 84:5-10

Help us?
Click on verse(s) to share them!
5ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे.
6शोकाच्या खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो.
7ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते.
8हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक.
9हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.
10तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.

Read स्तोत्र. 84स्तोत्र. 84
Compare स्तोत्र. 84:5-10स्तोत्र. 84:5-10