Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 80

स्तोत्र. 80:5-19

Help us?
Click on verse(s) to share them!
5तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत.
6तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस, आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात.
7हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
8मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला.
9तू त्याकरता जागा तयार केली; त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.
10त्याच्या सावलीने पर्वत, त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले.
11त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.
12तू त्यांची कुंपणे कां मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
13रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.
14हे सेनाधीश देवा, तू मागे फिर; स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे.
15हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर.
16ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.
17तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;
18मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
19हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण. आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.

Read स्तोत्र. 80स्तोत्र. 80
Compare स्तोत्र. 80:5-19स्तोत्र. 80:5-19