Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 72

स्तोत्र. 72:13-20

Help us?
Click on verse(s) to share them!
13तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, आणि गरजवंताचा जीव तो तारील.
14तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल, आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे.
15राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.
16तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो; तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.
17राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.
18परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
19त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
20इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.

Read स्तोत्र. 72स्तोत्र. 72
Compare स्तोत्र. 72:13-20स्तोत्र. 72:13-20