Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 5

स्तोत्र. 5:2-8

Help us?
Click on verse(s) to share them!
2माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे.
3परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.
4खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस.
5गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.
6खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.
7पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन.
8हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.

Read स्तोत्र. 5स्तोत्र. 5
Compare स्तोत्र. 5:2-8स्तोत्र. 5:2-8