Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 58

स्तोत्र. 58:5-11

Help us?
Click on verse(s) to share them!
5गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
6हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
7जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
8गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
9तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
10नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
11म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”

Read स्तोत्र. 58स्तोत्र. 58
Compare स्तोत्र. 58:5-11स्तोत्र. 58:5-11