Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 58

स्तोत्र. 58:1-8

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
2नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
3दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
4त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
5गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
6हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
7जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
8गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.

Read स्तोत्र. 58स्तोत्र. 58
Compare स्तोत्र. 58:1-8स्तोत्र. 58:1-8