2कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.