Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 37

स्तोत्र. 37:2-22

Help us?
Click on verse(s) to share them!
2कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
3परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
4परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
5तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
8रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
9कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
14जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
15परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
16अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
17कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
18परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
19वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
20परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
21दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
22जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.

Read स्तोत्र. 37स्तोत्र. 37
Compare स्तोत्र. 37:2-22स्तोत्र. 37:2-22