Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 33

स्तोत्र. 33:12-18

Help us?
Click on verse(s) to share them!
12परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
13परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.
14तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
15ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
16पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
17घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
18पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,

Read स्तोत्र. 33स्तोत्र. 33
Compare स्तोत्र. 33:12-18स्तोत्र. 33:12-18