1मुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
2दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
3संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.
4तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.