Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 144

स्तोत्र. 144:2-14

Help us?
Click on verse(s) to share them!
2तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
3हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
4मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.
5हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.
6विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
7वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.
8त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
9हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;
10तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.
11मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
12आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
13आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.
14मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;

Read स्तोत्र. 144स्तोत्र. 144
Compare स्तोत्र. 144:2-14स्तोत्र. 144:2-14