Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते - शास्ते 5

शास्ते 5:9-18

Help us?
Click on verse(s) to share them!
9माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
10पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.
11पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.
12जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
13तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले.
14अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.
15इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.
16खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
17गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला.
18जबुलून व नफताली या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.

Read शास्ते 5शास्ते 5
Compare शास्ते 5:9-18शास्ते 5:9-18