Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 6

लेवी. 6:15-20

Help us?
Click on verse(s) to share them!
15याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर सपिठ, थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगूलपणासाठीचे सुवासीक हव्य होय.
16अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
17ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण या सारखेच हेही परमपवित्र आहे.
18या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.
19परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
20“अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.

Read लेवी. 6लेवी. 6
Compare लेवी. 6:15-20लेवी. 6:15-20