Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 5

लेवी. 5:13-19

Help us?
Click on verse(s) to share them!
13अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.”
14नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
15“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे; हे दोषार्पण होय.
16ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
17परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
18त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
19हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”

Read लेवी. 5लेवी. 5
Compare लेवी. 5:13-19लेवी. 5:13-19