Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 4

लेवी. 4:5-12

Help us?
Click on verse(s) to share them!
5मग अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे.
6याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
7मग याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
8आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
9दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी;
10शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
11गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
12अशाप्रकारे सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.

Read लेवी. 4लेवी. 4
Compare लेवी. 4:5-12लेवी. 4:5-12