Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 25

लेवी. 25:29-35

Help us?
Click on verse(s) to share them!
29एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
30परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
31तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
32परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
33एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
34लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
35तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;

Read लेवी. 25लेवी. 25
Compare लेवी. 25:29-35लेवी. 25:29-35