Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 23

लेवी. 23:24-34

Help us?
Click on verse(s) to share them!
24“इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
25तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे.”
26परमेश्वर मोशेला म्हणाला,
27“सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे.
28त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
29त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
31तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
32तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
33परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
34“इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;

Read लेवी. 23लेवी. 23
Compare लेवी. 23:24-34लेवी. 23:24-34