Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 18

लेवी. 18:18-27

Help us?
Click on verse(s) to share them!
18तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
19स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते.
20तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको.
21तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.
22स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
23कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.
24अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले.
25त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाशांचा त्याग करीत आहे.
26ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये.
27कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.

Read लेवी. 18लेवी. 18
Compare लेवी. 18:18-27लेवी. 18:18-27