Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रोम. - रोम. 2

रोम. 2:2-14

Help us?
Click on verse(s) to share them!
2पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.
3तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?
4किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
5पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
6तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.
7म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;
8परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप.
9संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
10पण प्रत्येक चांगले करणार्‍या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
11कारण देवाजवळ पक्षपात नाही.
12कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
13कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.
14कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात.

Read रोम. 2रोम. 2
Compare रोम. 2:2-14रोम. 2:2-14