Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रोम. - रोम. 11

रोम. 11:29-35

Help us?
Click on verse(s) to share them!
29कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.
30कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे.
31त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी.
32कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.
33अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
34असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता?
35किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’

Read रोम. 11रोम. 11
Compare रोम. 11:29-35रोम. 11:29-35