Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रोम. - रोम. 11

रोम. 11:25-32

Help us?
Click on verse(s) to share them!
25बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.
26आणि सर्व इस्राएल अशाप्रकारे तारले जाईल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सियोनापासून उद्धारक येईल, आणि याकोबातून अभक्ती घालवील.
27आणि मी त्यांची पापे दूर करीन. तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’
28ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत.
29कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.
30कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे.
31त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी.
32कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.

Read रोम. 11रोम. 11
Compare रोम. 11:25-32रोम. 11:25-32