Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रोम. - रोम. 11

रोम. 11:13-21

Help us?
Click on verse(s) to share them!
13पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो.
14यहूदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे.
15कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय?
16कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत.
17आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास
18तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे.
19मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले.
20बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग;
21कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही.

Read रोम. 11रोम. 11
Compare रोम. 11:13-21रोम. 11:13-21