Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 8

योहा. 8:9-23

Help us?
Click on verse(s) to share them!
9हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती.
10नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?”
11ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”
12पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
13यावरुन परूशी त्यास म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.”
14येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही.
15तुम्ही देहानुसार न्याय करता; मी कुणाचा न्याय करीत नाही.
16आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोसुध्दा आहे.
17तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.
18मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.”
19यावरुन ते त्यास म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
20तो परमेश्वराच्या भवनात शिकवीत असताही वचने जामदारखान्यात बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
21पुन्हा तो त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.”
22यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.”
23तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही.

Read योहा. 8योहा. 8
Compare योहा. 8:9-23योहा. 8:9-23