Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 7

योहा. 7:3-19

Help us?
Click on verse(s) to share them!
3म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत.
4जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.”
5कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
6त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे.
7जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.
8तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.”
9असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला.
10पण त्याचे भाऊ सणाला वर गेल्यानंतर तोसुध्दा, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.
11तेव्हा, यहूदी त्यास सणात शोधीत होते आणि म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?”
12आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.”
13तरी यहूद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे.
14मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला.
15तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?”
16त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.
17जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल.
18जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
19मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”

Read योहा. 7योहा. 7
Compare योहा. 7:3-19योहा. 7:3-19