Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 2

योहा. 2:10-20

Help us?
Click on verse(s) to share them!
10त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.”
11येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
12त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.
13मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरूशलेम शहरास वर गेला.
14आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले.
15तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले.
16व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
17तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.
18त्यावरून यहूदी त्यास म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?”
19येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.”
20यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?”

Read योहा. 2योहा. 2
Compare योहा. 2:10-20योहा. 2:10-20