Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 16

योहा. 16:17-29

Help us?
Click on verse(s) to share them!
17तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हास, ‘थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”
18ते म्हणत होते, हा ‘थोड्या वेळाने’ असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो ते आम्हास समजत नाही.
19आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हणले की, थोड्या वेळाने, तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, याविषयी एकमेकांना विचारीत आहात काय?
20मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हास दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
21स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.
22आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
23आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल.
24तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
25या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे.
26त्यादिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही.
27कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
28मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
29त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही.

Read योहा. 16योहा. 16
Compare योहा. 16:17-29योहा. 16:17-29