Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 19

यहो. 19:12-46

Help us?
Click on verse(s) to share them!
12ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.
13तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;
14ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.
15कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.
16जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
17इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.
18त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;
19आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;
20रब्बीथ, किशोन व अबेस;
21रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,
22त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.
23इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
24पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
25त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
26अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
27ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.
28तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.
29तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.
30उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;
31आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
32सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
33त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
34तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
35त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
36अदामा, राम व हासोर;
37केदेश, एद्रई व एन-हासोर;
38इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.
39नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.
40सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.
41त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.
42शालब्बीन व अयालोन व इथला;
43एलोन व तिम्ना, एक्रोन;
44एलतके, गिब्बथोन व बालाथ;
45यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन.
46मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.

Read यहो. 19यहो. 19
Compare यहो. 19:12-46यहो. 19:12-46