Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 9

प्रेषि. 9:11-24

Help us?
Click on verse(s) to share them!
11प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे.
12शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.”
13परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू, मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे; यरूशलेम शहरातील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
14आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
15परंतु प्रभू म्हणाला, “जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
16माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,”
17हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”
18लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.
19नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
20यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे.
21ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले ते म्हणाले, “यरूशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम शहरातील मुख्य याजकांसमोर उभे करणार आहे.”
22परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
23काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
24यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.

Read प्रेषि. 9प्रेषि. 9
Compare प्रेषि. 9:11-24प्रेषि. 9:11-24