Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 4

प्रेषि. 4:15-25

Help us?
Click on verse(s) to share them!
15मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले.
16ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही.
17परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.”
18मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका.
19परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
20कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.”
21तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.
22कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.
23तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
24ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे.
25तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?

Read प्रेषि. 4प्रेषि. 4
Compare प्रेषि. 4:15-25प्रेषि. 4:15-25