Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 27

प्रेषि. 27:23-39

Help us?
Click on verse(s) to share them!
23मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
24आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.
25तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.
26परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”
27चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.
28त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.
29ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.
30खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या.
31परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”
32यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.
33पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला, तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्नाचा कणही खाल्ला नाही.
34तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हास विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही.”
35असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
36ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.
37आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो.
38त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
39दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.

Read प्रेषि. 27प्रेषि. 27
Compare प्रेषि. 27:23-39प्रेषि. 27:23-39