Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 21

प्रेषि. 21:16-21

Help us?
Click on verse(s) to share them!
16कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
17आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
18दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
19पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
20जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे.
21या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.

Read प्रेषि. 21प्रेषि. 21
Compare प्रेषि. 21:16-21प्रेषि. 21:16-21