Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 1

प्रेषि. 1:7-20

Help us?
Click on verse(s) to share them!
7तो त्यांना म्हणाला, “पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.
8परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरूशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”
9असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले.
10नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले.
11आणि ते असे बोलले, “अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल.”
12मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले.
13आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते, तिथे गेले.
14हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
15त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये, सुमारे एकशेवीस मनुष्यांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला,
16“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते, ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
17तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.”
18(त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.
19हे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.)
20स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की, त्याचे घर उजाड पडो, व त्यामध्ये कोणीही न राहो. आणि, त्याचा हुद्दा दूसरा घेवो.

Read प्रेषि. 1प्रेषि. 1
Compare प्रेषि. 1:7-20प्रेषि. 1:7-20