Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 19

प्रेषि. 19:19-25

Help us?
Click on verse(s) to share them!
19काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली.
20अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.
21या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”
22म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
23याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला.
24देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.
25त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो.

Read प्रेषि. 19प्रेषि. 19
Compare प्रेषि. 19:19-25प्रेषि. 19:19-25