Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 15

प्रेषि. 15:4-11

Help us?
Click on verse(s) to share them!
4नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले.
5तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.
6मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले.
7तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली.
8आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
9त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
10असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?
11तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.

Read प्रेषि. 15प्रेषि. 15
Compare प्रेषि. 15:4-11प्रेषि. 15:4-11