Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 13

प्रेषि. 13:40-52

Help us?
Click on verse(s) to share them!
40संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा.
41अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
42जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा.
43सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, पौल व बर्णबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली.
44पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.
45यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला.
46पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ.
47प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’
48जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
49आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.”
50तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
51मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले.
52इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.

Read प्रेषि. 13प्रेषि. 13
Compare प्रेषि. 13:40-52प्रेषि. 13:40-52