Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 8

नीति. 8:1-10

Help us?
Click on verse(s) to share them!
1ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
2रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, ज्ञान तिला चौकाकडे उभे करते.
3ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते.
4“लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते.
5अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा.
6ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन,
7कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे.
8माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही.
9ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत.
10रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या.

Read नीति. 8नीति. 8
Compare नीति. 8:1-10नीति. 8:1-10