Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 6

नीति. 6:8-22

Help us?
Click on verse(s) to share them!
8तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
9अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील?
10“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”
11असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
12दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,
13त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.
14त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो.
15यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.
16परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः
17गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,
18मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,
19लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
20माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
21ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
22जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.

Read नीति. 6नीति. 6
Compare नीति. 6:8-22नीति. 6:8-22