Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 5

नीति. 5:15-22

Help us?
Click on verse(s) to share them!
15तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी.
16तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां?
17ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.
18तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
19कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
20माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
21मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो.
22दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील.

Read नीति. 5नीति. 5
Compare नीति. 5:15-22नीति. 5:15-22