Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 3

नीति. 3:22-34

Help us?
Click on verse(s) to share them!
22ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.
23नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;
24तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.
25जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;
26कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील.
27ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.
28एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”
29तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.
30काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.
31तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.
32कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.
33परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो.
34तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो.

Read नीति. 3नीति. 3
Compare नीति. 3:22-34नीति. 3:22-34