Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 30

नीति. 30:18-28

Help us?
Click on verse(s) to share them!
18मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
19आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,
20हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही.
21तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत.
22जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख;
23विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी.
24पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
25मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.
26ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात.
27टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात.
28पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते.

Read नीति. 30नीति. 30
Compare नीति. 30:18-28नीति. 30:18-28