Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गीत. - गीत. 4

गीत. 4:5-12

Help us?
Click on verse(s) to share them!
5हरीणीची जी जुळी, जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
6दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर, ऊदाच्या टेकडीवर जाईन.
7प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
8लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये; अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
9अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
10माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
12माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.

Read गीत. 4गीत. 4
Compare गीत. 4:5-12गीत. 4:5-12