Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गीत. - गीत. 2

गीत. 2:11-17

Help us?
Click on verse(s) to share them!
11बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.
12भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.
13अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
14माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे. मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
15(ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे. कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.
16(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे. तो आपला कळप कमळांच्यामध्ये चारीत आहे.
17(ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फीर.

Read गीत. 2गीत. 2
Compare गीत. 2:11-17गीत. 2:11-17