Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 23

गण. 23:7-13

Help us?
Click on verse(s) to share them!
7नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर.
8ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ?
9मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.
10इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे, आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे!
11बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.
12बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय?
13नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे.

Read गण. 23गण. 23
Compare गण. 23:7-13गण. 23:7-13